दापोली ता.०७ (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई येथील आरोग्यसेविका जयश्री अनिल पांढरे यांना काल ता. ६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता दापोली येथील न्यायालयासमोर असलेल्या सतीमाता मंदिरासमोर मारहाण करण्यात आली होती.

या मारहाण करणार्याना अटक करावी या मागणीसाठी आज दापोली तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी दापोली पोलीस ठाणे येथे येवून पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली आहे.
मारहाणीची हि घटना काल ता. ६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता घडली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.