खेड : (चंद्रकांत बनकर) : जामगे गावची ग्रामदैवत श्री कोटेश्वरी मानाई देवीच्या पालखीचे मंगळवार दिनांक १० मार्च रोजी शिवसेना नेते तसेच माजी कॅबिनेट मंत्री रामदासभाई कदम यांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरणात आगमन झाले.
सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास देवीची पालखी कदम यांच्या निवासस्थानी पोहोचताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यावेळी शिवसेना नेते रामदासभाई कदम, त्यांच्या पत्नी सौ. ज्योती कदम, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम व त्यांच्या पत्नी यांनी देवीची खाणानारळाने ओटी भरून मनोभावे पूजा केली.
त्यानंतर रामदासभाई कदम आणि अण्णा कदम यांनी स्वतः पालखीला खांदा देत देवीची पालखी घरी आणली. या प्रसंगी परिसरात मोठ्या भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
देवीच्या आगमनावेळी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने देवीचे स्वागत करण्यात आले असून भक्तांनी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला