रोहा ( अल्ताफ चोरडेकर ) : रायगड जिल्ह्यात बाल विवाहचे प्रकार खूप वाढत असून या विषयी जिल्ह्यात दर महिन्याला स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होत आहेत. याच अनुषंगाने रोहा तालुक्यातील एका आदिवासी वाडी होणारा बाल विवाह रोहा पोलिसांनी रोखल्याची घटना समोर आली आहे.
तालुक्यातील गायचोळ आदिवासी वाडी येथे १६ मार्च २०२६ रोजी नियोजित असलेला हा बालविवाह पोलिसांनी कायदेशीर हस्तक्षेप करून रद्द केला. गायचोळ आदिवासी वाडी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुली बरोबर एक २० वर्षीय तरुणाचे लग्न संपन्न होणार होते.वाडीवर लग्नाची जय्यत तयारी झाली असून जवळच्या नातेवाईकांना व ओळखीच्या लोकांना लग्नपत्रिका वाटप देखील करण्यात आले होते.अशा परिस्थितीत सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली.
रोहा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांना सदर घटनेची माहिती समजताच त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार केला. आणि क्षणातच पोलिसांचा पथक घटना स्थळी रवाना झाला. पोलिसांनी वधू व वर पक्षातील मंडळींना समज देत होणारे विवाह बालविवाह असून ते बेकायदेशीर आहे असे सांगितले. त्यानंतर वधू व वरांच्या घरातील प्रमुख मंडळींना पोलीस ठाण्यात बोलावून पोलिस निरीक्षक मारुती पाटील व कर्मचाऱ्यांनी अनमोल मार्गदर्शन केले. पोलिस पथकांमध्ये
नरेश मोरे बीट अंमलदार,महिला पोलीस कर्मचारी सौ.टेमकर,
पोलीस नाईक भास्कर शीद, सहाय्यक बीट अंमलदार, गावचे पोलीस पाटील,ग्रूप ग्रामपंचायत सरपच आतिष मोरे, ग्रामसेवक सोनुने,आशा वर्कर्स यांचा समावेश होता.