साखरपा : बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये आपल्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकणारी तन्वी कोलते उद्या आपल्या मायभूमी परतत आहे. तिच्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी उद्या, शुक्रवार दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता साखरपा परिसरात एका भव्य स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला चाहत्यांची आणि समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता त्यासाठी स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे. रॅलीच्या मार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
