खेड : सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल सायन्स ऑलिंपियाड या द्वितीय पातळीवरील परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये येथील रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या परीक्षेमध्ये इयत्ता सहावीतील अर्णव घुमरे याने ६० पैकी ६० गुण मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवर ७ वा व विभागीय पातळीवर तिसरा क्रमांक पटकावला. त्याला रु. २५००/- रोख पारितोषिक व विभागीय रौप्यपदक प्रदान करण्यात आले. तसेच आरव सुर्वे याला विभागीय प्राविण्य प्रमाणपत्र व रु. ५००/- बक्षीस, इयत्ता आठवीतील प्रणव गांगर्डे याला रु. १०००/- रोख पारितोषिकासह विभागीय कांस्यपदक आणि शौर्य गवस यालाही रु. ५००/- पारितोषिक व विभागीय प्राविण्य प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व विज्ञान विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नॅशनल सायन्स ऑलिंपियाडमध्ये रोटरीचे यश !
