चिपळूण : शहरातील मळ्यातील स्वयंभू श्री गणेश मंदिरात मंगळवारी कार्पास वस्त्र व्रत आयोजित करण्यात आले होते.
या उपक्रमात शेकडो भक्तगणांनी सहभागी होऊन श्रींच्या चरणी सेवा रुजू केली. देवस्थानचे पुजारी मालक संजय देवधर यांनी हा उपक्रम आयोजित केला होता.दर्शनालाही मोठी गर्दी होती
यानिमित्ताने श्रींच्या मूर्तीवर सुंदर आरास करण्यास आली होती. त्यामुळे मूर्तीचे रूप अधिकच विलोभनीय झाले होते.
चिपळूणच्या मळ्यातील स्वयंभू गणेश मंदिरात कार्पास वस्त्र व्रताला उदंड प्रतिसाद..!
