खेड : – तालुक्यातील कुरवळ जावळी गावातील श्रीमानाई देवीची जत्रा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र कृष्ण पक्ष पंचमी या शुभमुहूर्तावर मंगळवारी दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी साजरी होणार आहे.
सकाळी ८ वाजता मंदिरात स्थापित देवदेवतांची महापूजा, सकाळी ९ ते १० वाजता लाटेची पुजा व लाट पाडणे,सकाळी १० ते १२ वाजता लाटेची मिरवणूक, दुपारी १२:३० ते २ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ वाजता लाट बगाडावर चढविणे, रात्री ९:३० ते १०:३० निमंत्रित पालख्यांचे आगमन,स्वागत,पालखी भेट,रात्री १०:३० ते १२ वाजता निमंत्रीत पालख्यांसह श्रीमानाई मातेचा छबिना,रात्री १२ वाजता लोकनाट्य तमाशा सादर होणार आहे. तरी जत्रेचा सोहळा पाहण्यासाठी सहकुटूंब,सहपरिवार,मित्रमंडळीनी उपस्थित राहावे व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. असे विनम्र आवाहन कुरवळ जावळी ग्रामस्थ, श्रीमानाई देवी देवस्थान कमिटी आणि सभासद व कुरवळ जावळी ग्रामविकास मंडळ मुंबई,पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कुरवळ जावळी गावाची ग्रामदेवता श्रीमानाई देवीचा मंगळवारी वार्षिक जत्रोत्सव !
