रोहा ( अल्ताफ चोरडेकर ) : देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस आय नेत्यांनी आपल्या जिवाजी बाजी लावली. असे असताना जनतेला अच्छे दिनाचे खोटे आश्वासने देऊन भाजपने केंद्रात सत्ता स्थापन केली. वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, डिझेल, पेट्रोल आणि जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगणाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत देशाला काँग्रेस आय पक्षाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन काँग्रेस आय पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ.रागिणी नायक यांनी केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात संघटन सृजन अभियान सुरु करण्यात आले आहे. या संदर्भात रोहा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने रोहे शहरातील शासकीय विश्राम गृहात मंगळवारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ.रागिणी नायक यांनी मार्गदर्शन केले.प्रमुख मार्गदर्शिका डॉ.रागिणी नायक यांचे रोहे शहर अध्यक्ष मितेश कल्याणी यांनी गुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी व्यासपीठावर काँग्रेस जिल्हा कमिटी अध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावंकर,जेष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर, निखिल ढवळे, तालुका अध्यक्ष सुनिल देशमुख,रोहे शहर अध्यक्ष मितेश कल्याणी,नागोठणे शहर अध्यक्ष अशपाक पानसरे,कार्यकर्ते आदिल पानसरे, पंचायत समितीचे माजी सदस्य बिलाल कुरेशी, नजीर सय्यद इत्यादी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही : राष्ट्रीय प्रक्त्या डॉ. रागिणी नायक
