चिपळूण: प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांची चिपळूण परशुराम येथील रिसॉर्टमध्ये भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हा चिटणीस व चिपळूण अर्बन बँक संचालक श्री समीर टाकळे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.

यावेळी डॉ. श्रीहास बडबडे, डॉ. अभिजीत सावंत, गौतम रेडीज, योगेश उर्फ आबा साडविलकर,प्रसाद करमरकर,पप्पू महाडिक,यतीन दांडेकर आदी मान्यवर उपस्थितही उपस्थित होते. दिग्दर्शक मांजरेकर यांनी चिपळूणमधील या मान्यवरांबरोबर संवाद साधला.