आयसीसी विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक आज जाहीर करण्यात येणार आहे. यंदाचा टी-२० विश्वचषक अत्यंत खास असणार आहे, कारण ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करत आहेत. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवली जाईल. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार असून, या संघांना प्रत्येकी पाच-पाच संघांच्या चार गटांत विभागले जाईल. भारतातील आणि श्रीलंकेतील प्रमुख मैदानांवर या विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि अहमदाबाद अशी असणार आहेत तर श्रीलंकातील कोलंबो आणि कँडी इथे होणार आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, स्पर्धेच्या अंतिम फेरीत (Final) पोहोचणाऱ्या संघांमध्ये क्रिकेटचा थरार अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या या महासंग्रामाचे संपूर्ण वेळापत्रक आज जाहीर झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचेल. या विश्वचषकाचा पहिला सामना ७ फेब्रुवारी २०२६ रोजी खेळला जाईल, तर ८ मार्च रोजी अंतिम सामना होण्याची शक्यता आहे. मात्र, या अंतिम सामन्याचे ठिकाण (Venue) निश्चित करताना आयसीसीला मोठी अडचण येत आहे, कारण ते अहमदाबाद किंवा कोलंबो या दोन ठिकाणांपैकी एकावर अवलंबून असेल. या संभ्रमाचे मुख्य कारण आहे पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही या भूमिकेवर ठाम असल्याने, आयसीसीने एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे, जर पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला, तर क्रिकेटच्या या महामुकाबल्याचे आयोजन कोलंबो (श्रीलंका) येथे केले जाईल. जर अंतिम सामना पाकिस्तान वगळता अन्य कोणत्याही संघांमध्ये झाला, तर तो भारताच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. त्यामुळे, अंतिम सामन्याच्या ठिकाणाचे गुपित स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.