रत्नागिरी) निवळी ते जयगड मार्ग हा नेहमीच दिवसरात्र वाहतुकीचा वर्दळीचा मार्ग म्हणुन ओळखला जातो.
जिंदाल एनर्जी, पोर्ट आणि आंग्रे पोर्ट वरुन अवजड वाहनांची वाहतुक सुरु असते,तसेच बाकी नियमित वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते परंतु खुप वेळा ओव्हरलोड वाहने ही वळण, चढात बंद पडतात, वाहतुकीचा खोळंबा होतो, याकडे आरटीओ विभागाने कधीच गांभिर्याने घेतलेले दिसत नाही, सदर वाहने ओव्हरलोड अती वेगाने असतात त्यात अनेक निष्पाप तरुणांचे बळी गेले आहेत.
तसाच प्रकार आज जयगड निवळी मार्गावर कळझोंडी फाटा नं.१ जवळच अवजड वाहन बंद पडले असून पुर्ण रस्ता व्यापला आहे , त्यामुळे वाहतुकीला ये जा करण्यासाठी अडथळा येत आहे.याकडे आरटीओ विभागाने गांंभिर्याने घेतले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
जयगड निवळी मार्गावर अवजड वाहन बंद पडल्यामुळे मुळे वाहतुकीला अडथळा
