पनवेल (वैभव लबडे) : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ यांच्या सुकाणू समितीने पुकारलेल्या निर्णयानुसार आजपासून जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा एल्गार पुकारण्यात आला आहे.
जुनी पेन्शन योजना: १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना अनुदानित आणि त्यानंतर १००% अनुदानावर आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
कॅशलेस सुविधा: सर्व सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना सर्व रुग्णालयांत कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक आरोग्य विमा योजना लागू करावी.
प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप
