मुंबई (प्रतिनिधी): येत्या प्रजासत्ताक दिनापासून हार्बर मार्गावर देखील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते पनवेल पर्यंत एसी लोकल धावतील अशी माहिती रेल्वे अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली.
अधिक माहिती देताना ते म्हणाले की,सध्या मध्य रेल्वे वरती १८२० लोकल चालू आहेत. ज्यापैकी 80 एसी लोकल या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून कल्याण पर्यंत चालवल्या जात आहेत.
26 जानेवारीला 14 एसी लोकल या हार्बर लाइन वरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पासून पनवेल पर्यंत चालवण्यास सुरुवात होईल.पहिली लोकल ४.१५ मिनिट पासून वाशी पासून वडाला रोड पर्यंत चालवली जाईल. नंतर ती परतीचा प्रवास करून परत येईल.नंतर पनवेल वरून नऊ वाजून नऊ मिनिटांनी सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला दहा वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल.संध्याकाळच्या पीक मध्ये मध्य रेल्वे द्वारे दोन एसी लोकल असतील. पहिली लोकल वडाला वरून निघेल तर दुसरी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून निघेल.ज्यांची इच्छा होती हर्बल मार्गावर देखील एसी लोकल चालू व्हावी ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.या सर्व लोकल सुट्टीच्या दिवशी आणि हॉली डे या दिवशी सोडून बाकीच्या सर्व दिवशी या लोकल चालवल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली.
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
