मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागात टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या वतीने कर्करोग प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.

आज दिनांक 22/4/2026 टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या वतीने जी-उत्तर विभागात कर्क रोग प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत कर्क रोग होऊ नये म्हणुन काय काळजी घ्यावी तसेच तसेच कर्क रोगाची कोणती लक्षणे असतात,आणि कर्क रोगाची लागण झाल्यास न घाबरता त्यावर उपचार कसे करावेत,ईत्यादी तसेच कर्क रोगाचे उपचार महागडे असल्यामुळे ते शासनाच्या कोणत्या योजनेतून करावे ईत्यादी बाबत मार्गदर्शन टाटा मेमोरियल रुग्णालयातील डाॅ.अंजली पांडे व ईतर सहाय्यक समाज विकास अधिकारी यांनी केले. या कार्यशाळेत समुप,पर्यवेक्षक, मुकादम यांनी सहभाग घेतला.कर्क रोग प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन यापुढे घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सर्वच चौक्यांमधुन कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मे महिण्यात घेण्याचे आयोजन केले आहे. अशा प्रकाराच्या कार्यशाळेचे आयोजन केल्यामुळे घकव्य खात्यातील अधिकारी यांनी टाटा मेमोरियल रुग्णालय यांचे आभार मानले.