मुंबई : बारामती पोटनिवडणुकीत अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही उमेदवार देणार नाही. असे स्पष्ट केले होते. बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत सुनेत्रावहिनी पवार चांगल्या मतांनी निवडून येतील.

बारामतीची जनता त्यांना ऐतिहासिक विजय मिळवून देईल, असा आम्हाला विश्वास आहे. काँग्रेसने विलंब का होईना पाठिंबा दिला, ही जमेची बाजू आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, आदरणीय पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांनी देखील आम्ही उमेदवार देणार नाही अशी भूमिका दादांना श्रद्धांजली म्हणून जाहीर केलेली आहे. अपक्ष उमेदवार हे उभे राहिलेले जरी असले तरी बारामतीची जनता ही फार मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक सुनेत्रावहिनी पवार यांना विजय करून देतील, हा विश्वास आम्हाला आहे, मतदानाची टक्केवारी किती होते आणि आकडा काय येतो त्यावर सगळं अवलंबून आहे,असे शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.