चिपळूण : World Masters Sports Championships 2026 अंतर्गत श्रीराचा, थायलंड येथे दि. 17 ते 20 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित इंटरनॅशनल अॅथलेटिक्स आणि स्विमिंग स्पर्धांमध्ये चिपळूणच्या राष्ट्रीय खेळाडू सौ. निशा आंबेकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली.
त्यांनी खालील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून तिहेरी यश संपादन केले —
🥇 थाळीफेक — सुवर्णपदक
🥇 गोळाफेक — सुवर्णपदक
🥇 भालाफेक — सुवर्णपदक

अशा प्रकारे 3 सुवर्णपदकांची भरघोस कमाई करत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चिपळूणचे नाव उज्ज्वल केले.

सौ. निशा आंबेकर या प्रसिद्ध करसल्लागार श्री गजानन आंबेकर यांच्या पत्नी असून, त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय पती, कुटुंबीय, जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी तसेच हितचिंतकांना दिले आहे.
त्यांच्या या यशामुळे चिपळूण सायकलिंग क्लबच्या क्रीडा परंपरेत आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे. सौ निशा या विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्या चिपळूण सायकलिंग क्लब च्या उपाध्यक्ष, क्रीडाभारती च्या प्रांत सह मातृशक्ती प्रमुख, संस्कृतभारती च्या जिल्हा संपर्क प्रमुख, स्विमिंग कोच, हिंदू संघटन, व्यसनमुक्ती अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे सौ. निशा आंबेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या या यशामुळे क्रीडा क्षेत्रात चिपळूणचा नावलौकिक अधिक उंचावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.