मुंबई : मिसिंग लिंक हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीतून साकारला आहे. मुंबई आणि पुण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण वेळेची बचत होणार आहे. खंडाळा घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे शिवाय प्रवास गतिमान होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणेवासियांच्यादृष्टीने हा प्रकल्प जीव्हाळ्याचा ठरला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे श्री. राधेश्याम मोपलवार हे व्यवस्थापकीय संचालक असताना या प्रकल्पाचा कार्यारंभ झाला. त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या कौशल्यपूर्ण टीमने हा प्रकल्प अल्पावधीत साकारला. मुदतीच्या दोन महिन्यापूर्वीच पुलाच्या केबल जोडणीचे काम मार्गी लागले. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांना धन्यवाद दिले आहेत.
About The Author
Related Posts
Recent Posts
- चिपळूणजवळ दोन एस.टी. बसची समोरसमोर धडक : 30 प्रवासी जखमी
- कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात वाहनांवर गळती सुरूच’आयआयटी’नुसार उपाययोजना करण्याच्या बाता निष्फळच!
- मनसे राजापूर तालुका कार्यकारिणी आढावा बैठक उत्साहात संपन्न…
- लांजात नवचंडी महायाग यज्ञ संपन्न….
- लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !