मुंबई : महानगरपालिकेचे सह-आयुक्त विश्वास शंकरवार तसेच पी साऊथ वॉर्डाचे सहायक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी यांनी आज कांदिवली पूर्व मतदारसंघाचे आमदार मा. अतुल भातखळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत ‘स्व-जन गणना मोहिमे’चा शुभारंभ आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी स्वतः नोंदणी करून या महत्त्वपूर्ण मोहिमेत सहभाग नोंदवला.

“प्रत्येक नागरिकाची अचूक माहिती देशाच्या विकासाला नवी दिशा देण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही जनगणना केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून नागरिकांच्या गरजा, सुविधा आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या घराची अचूक नोंदणी करावी आणि योग्य माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.” असे आवाहन आमदार अतुल भातखळकर केले.