खेड (प्रतिनिधी) : – तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले आहे. अनेक गावांतील विहिरी आणि पाणवठे आटल्याने प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
सध्या तालुक्यातील ११ गावे आणि २१ वाड्यांमधील तब्बल १४०८ नागरिकांना एका शासकीय टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये घेरारसाळगड-भराडे धनगरवाडी, निमणी धनगरवाडी, कशेडी- बंगला, बोरटोक, खवटी-खालची धनगरवाडी, वरची धनगरवाडी, सवेणी-धनगरवाडी, केळणे-भोसलेवाडी, मांगलेवाडी, धनगरवाडी, तळे-बौद्धवाडी, पालांडेवाडी, कासई-बोरवाडी, खांडेकरवाडी, तिसंगी-धनगरवाडी, हुंबरी-महाळुंगे धनगरवाडी, तुळशी खुर्द-बुद्रुक परिसरातील कुपजाई धनगरवाडी, चिनकटेवाडी, गुरववाडी, शिर्शि -माळीवाडी आणि चिंचवाडी या भागांचा समावेश आहे.