नाशिक: प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा देताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही या कारणावरून संतापलेल्या वन कर्मचारी असलेल्या महिलेने भर कार्यक्रमात मंत्री महाजन यांना जाब विचारल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला.
हे लोक बाबासाहेबांचे नाव पुसण्याचा प्रयत्न करत असून मी कधीही बाबासाहेबांचे नाव पुसण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही.. मला सस्पेंड केले तरी चालेल असे या महिलेने बेधडकपणे सांगितल्यामुळे कार्यक्रमात गोंधळ माजला. या महिलेला ताब्यात घेण्यात आले असून ही चूक लक्षात येताच मंत्री महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली. ज्यांनी देशाला संविधान दिले त्या महापुरुषाचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात का घेतले नाही असा सवाल या वन कर्मचारी असलेल्या महिलेने उपस्थित केला.त्यामुळे सारे चक्रावून गेले. माधवी जाधव असे वनरक्षक असलेल्या महिलेचे नाव आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
