मंडणगड : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी या शाखेचे जिल्हा सचिव संस्कार विभाग तसेच आंबडवे गावचे सुपुत्र डॉ अल्पेश अश्विनी अशोक सकपाळ यांना तेजस सेवा प्रतिष्ठान अहिल्यानगर संगमनेर यांच्या तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याने बौद्ध समाजातील धम्मकार्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 75 मान्यवराची निवड करण्यात आली असून त्या मध्ये डॉ अल्पेश सकपाळ यांचा समावेश आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा 4 जून 2026 रोजी संगमनेर अहिल्यानगर येथे संविधान अमृत मोहसव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ अल्पेश सकपाळ हे गेली 15 वर्षांपासून धार्मिक, सामजिक, शैक्षणिक, क्षेत्रात कार्यरत आहेत.2012 पासुन भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या जिल्हा शाखा रत्नागिरी येथे जिल्हा पदाधिकारी म्हणून कामकाज सुरू केले. आज एक जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहे.
रत्नागिरी, रायगड, मुंबई, पुणे जिल्ह्यातील एक प्रवचनकार म्हणून प्रबोधनाची प्रभावी चळवळ उभी करत आहेत. शिक्षक म्हणून कामगिरी सुध्दा करतात दापोली येथे कॉलेज वर प्राचार्य म्हणून आहे. अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहे.
या सर्व कार्याची पोच पावती म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.