पुणे : “ट्रम्प यांच्या तालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा नाचताना दिसत आहेत. मोदी सरकारने अमेरिकन कृषी उत्पादने भारतीय बाजारपेठेत आणण्यास सहमती दर्शवली असून, याचे भारतीय शेती आणि कोट्यवधी शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर दूरगामी आणि विनाशकारी परिणाम होणार आहेत,” अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मॅक्रो रुबीओ यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये भारत पुढील पाच वर्षांत ऊर्जा, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रात अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्सची उत्पादने खरेदी करणार असल्याचा उल्लेख केला आहे. याच संदर्भाने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.मोदी तडजोडीच्या राजकारणात अडकले आहेत. आपला देश पुन्हा एका परकीय शक्तीच्या गुलामीच्या उंबरठ्यावर उभा आहे,” असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
