चिपळूण : जिजाऊ योजनेअंतर्गत नवीन बस जिल्ह्यामध्ये आल्या आहेत. त्यामधील बस चिपळूण डेपोसाठी देण्यात आलेल्या नाहीत. नवीन पैकी दोन बस चिपळूणला देण्यात आल्या होत्या अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली व त्याही बस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परत मागून घेतल्या. या विषयावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडलद्वारे आगार व्यवस्थापक यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली व आपला संताप व्यक्त केला.
चिपळूण मध्ये काही जुन्या बस आहेत यामध्ये पावसाळ्याचे पाणी येत असल्यामुळे प्रवासी भिजत आहेत. काही एसटीच्या गाड्यांना नीट खिडक्याही नाहीत, व सीटाही मोडकळीस आल्या आहेत. या विषयासंदर्भात माजी सभापती शौकतभाई मुकादम, जयद्रथ खताते यांनी अधिकाऱ्यांना चांगलीच धारावर धरली. तसेच चिपळूण एसटी डेपोला नवीन बस ताबडतोब मिळाव्यात याकरिता आमदार शेखरजी निकम यांनी परिवहन मंत्र्याचे ही भेट घेतली.
तसेच चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही आगार व्यवस्थापकाच्या अधिकाऱ्यांना शिष्टमंडल भेटून निवेदन दिले.
यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, सेक्रेटरी जयंद्रथ खताते, दादासाहेब साळवी, पांडुरंग माळी, पंचायत समिती सदस्य शरद शिगवण, शौकत माखजनकर, प्रकाश पवार, विकास जोवेकर अधिक मान्यवर उपस्थितीत होते.