मुंबई दि. 04 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची राज्यसभेत सलग तिस-यांदा निवड झाल्यामुळे राज्यसभेत त्यांनी केलेल्या हॅट्रीकचा देशभरातील आंबेडकरी जनतेत प्रचंड आनंद आणि उत्साह आहे.

महाराष्ट्रातील गावागावात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या राज्यमंत्री आणि राज्यसभेतील सदस्यत्वाच्या हॅट्रीकबद्दल प्रचंड आनंद साजरा होत आहे. रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हयात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सलग तिस-यांदा राज्यसभेत निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार अनेक ठिकाणी करण्यात येत आहे.

देशभरात अनेक राज्यांमध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांसोबतच विविध दलित, बहुजन सामाजिक संघटनांच्या वतीनेही ना.रामदास आठवले यांचा अनेक ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आलेला आहे. दिल्ली, कर्नाटक ; हरियाणा, गुजरात, उत्तरप्रदेश, तेलंगाना, तामिळनाडु, मध्यप्रदेश आदि अनेक राज्यात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची तिस-यांदा राज्यसभेत निवड झाल्याबद्दल अनेक जिल्हा आणि तालुक्यामध्ये भव्य जाहीर सत्कार सोहळे आयोजित करण्यात आलेले आहेत.अनेक गावांत ना. रामदास आठवले यांचा वाजत गाजत मिरवणूक काढून भव्य सत्कार केला जात आहे.