मुंबई दि.04 – रिपब्लिकन पक्षाचे येत्या 16 जून 2026 रोजी सिल्वासा येथे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश, ठाणे प्रदेश, पालघर जिल्हा, सिल्वासा, दिव दमन दादरा नगर हवेली, वापी व गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांचे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

सिल्वासा मधील कुडाचा येथील खडीपाडा गावातील फोर स्टोन व्हिलेज रिसॉर्ट येथे 16 जून रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात विचारवंत अभ्यासक मंदार भारदे; सहकार क्षेत्रातील तज्ञ सलीम सय्यद आदी विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांना या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.