नवीदिल्ली : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगावर इंधन टंचाईचं भयावह संकट उभं राहिल्याचे चित्र होतं. असे असताना ऊर्जा सुरक्षा दिशेने भारताला मोठा जॅकपॉट लागला आहे. अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूचा महाप्रचंड साठा सापडला आहे. आता भारताला मोठा वायू साठा सापडल्यामुळे भारत इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भतेच्या दिशेने वाटलाच करु शकतो. अंदमान समुद्रात नैसर्गिक गॅसचा महत्त्वपूर्ण शोध लागला असून भारताच्या ऊर्जा सुरक्षा दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे.
ऑइल इंडिया लिमिटेडने अंदमान समुद्रात नैसर्गिक गॅसचा नवा शोध लावला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. हा शोध भारताच्या खोल समुद्री संशोधन मोहिमेला नवी दिशा देईल. यापूर्वी 2025 मध्ये श्री विजयापुरम-2 विहिरीतही गॅसचा शोध लागला होता. त्यात 87 टक्के मिथेनआढळला होता, जो व्यावसायिकदृष्ट्या उच्च दर्जाचा मानला जातो. या दोन्ही विहिरींमधील यशस्वी शोधांमुळे अंदमान बेसिनला ‘ऊर्जेचे महासागर’ म्हणून ओळखले जात आहे. हे संशोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समुद्र मंथन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश खोल समुद्री भागातील खनिज आणि ऊर्जा संसाधनांचा शोध घेणे हा आहे.