कणकवली : असलदे गावात दारूबंदी असताना गोवा बनावटीची अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली आहे, नुकत्याच झालेल्या पोलिस कारवाईनंतर संबंधितांना जाब विचारत चांगलीच समज दिली. गावातील शांतता, सामाजिक वातावरण आणि युवकांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या अवैध दारू विक्रीला ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे.यावेळी संशयित आरोपी अवधूत शामसुंदर वाळके या अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमाने दारू विक्री करत असल्याची कबुली देत असलदे गावाची माफी मागितली. यापुढे गावात दारु विक्री करणार नसल्याचे माफी मागत जाहीरपणे सांगितले आहे.
असलदे शिवाजीनगर येथे आरोपी अवधूत शामसुंदर वाळके यांच्या गोडाऊन कणकवली पोलिसांनी ७ जून रोजी रात्री १२.३० धाड टाकली. यानंतर गावात ग्रामसभेमध्ये दारूबंदी चा ठराव असताना देखील अवैध दारूचा व्यवसाय होत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. याबाबत मंगळवारी रात्री संशयित आरोपी अवधूत शामसुंदर वाळके तर सुरेंद्र वायंगणकर याला फोन करत कडक शब्दात दारू व्यवसाय बंद करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे, पत्रकार भगवान लोके, नरेंद्र हडकर,उपसरपंच सचिन परब,व्हाइस चेअरमन दयानंद हडकर,सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे,माजी सरपंच पंढरी वायंगणकर,महेश लोके, रघुनाथ लोके,प्रवीण डगरे,प्रदीप हरमलकर ,विजय आचरेकर,मनोज लोके,संदेश आचरेकर,अनिल लोके,दयानंद डगरे,विजय खरात, रुपेश खरात,गोविंद लोके,संतोष घाडी,संतोष डामरे,विष्णू डगरे,राजू जेठे,संदीप नरे ,प्रमोद डामरे आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
