मुंबई : डहाणू व परिसरातील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांबाबत पीडित कुटुंबीयांच्या वेदना आणि न्यायाची मागणी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयानुसार, संबंधित प्रकरणांच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करण्यात आले असून, विशेष शाखा, ठाणे येथील पोलीस उपायुक्त (DCP) मीना मकवाना यांच्या नेतृत्वाखाली हा तपास करण्यात येणार आहे.

आपल्या मुलींची सुरक्षितता, पालकांचा विश्वास आणि समाजाचे भवितव्य यांच्याशी संबंधित या गंभीर विषयात आता सक्षम व अनुभवी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू होत आहे. त्यामुळे पीडित कुटुंबांच्या न्यायाच्या लढ्याला मोठे बळ मिळाले असून, सत्य समोर येईल, असा विश्वास अधिक दृढ झाला आहे.