मुंबई : उबाठा गटाच्या जहाजाला संजय राऊत यांनी सगळ्यात मोठे भगदाड पाडले आहे. कारण त्यांनी उबाठा गट संपवण्याची सुपारी काँग्रेसकडून घेतली आहे. संजय राऊत आदित्य ठाकरे यांना प्रिय म्हणून शुभेच्छा देत असले तरी त्यांच्या मनात आदित्य ठाकरे यांच्याबद्दल अप्रियताच असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. संजय राऊत यांना दूर केले जात नाही तोपर्यंत उबाठा गटाचे जहाज आणखी खोलात जाईल, असा प्रहार भाजपा प्रदेशचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोक आठवड्याचे पाच दिवस काम करून शनिवार – रविवार सुट्टी घेतात. उद्धव ठाकरे यांचे उलट आहे. ते आठवड्याचे पाच दिवस सुट्टी घेऊन घरात बसतात आणि फक्त रविवारी पक्षाची बैठक घेतात. कधीतरी पाच – सहा महिन्यातून एकदा रविवारी बैठक घेऊन ना खासदार तुमच्यासोबत राहणार, ना आमदार, ना कार्यकर्ते. वीकेंडला बैठक घेऊन पक्ष चालवता येत नाही हे उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी लक्षात घ्यावे. मातोश्रीचे दरवाजे सर्वसामान्य शिवसैनिकांना, आमदारांना, खासदारांना, पदाधिकाऱ्यांना बंद आहेत. आता संजय राऊतांसाठीही तुम्ही दरवाजे बंद करा, असा सल्ला श्री. बन यांनी दिला.
संजय राऊत यांना दूर केले नाही तर उबाठाचे जहाज आणखी खोलात जाईल – नवनाथ बन यांचा प्रहार
