चिपळूण : सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस दलाने जिल्ह्यातील गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
चिपळूणच्या गोवळकोट येथील गोविंद गडावर चिपळूण पोलीस ठाणे तर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन bagate यांच्या सूचनेनुसार डी वाय एस पी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही मोहीम राबवली. गोविंद गडावरील तोफांचा परिसर, रेडजाई मंदिर, बुरुज, तटबंदी आणि पार्किंग एरियामध्ये स्वच्छता करण्यात आली. एरव्ही सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या हातात काठ्या आणि बंदुकी दिसतात. याच पोलिस दलाने हातात झाडू आणि फावडे घेऊन किल्ला परिसर स्वच्छ केला. याचबरोबर महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या गडकिल्ल्यांवर स्वच्छता राखावी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन आढळल्यास पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.