चिपळूण – पाऊस लांबणीवर पडला आहे सर्व सजीवांची पाण्यासाठी वाताहत होत आहे अनेक सजीव पाण्याविना तडफडत आहेत फार गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे या करीता चिपळूण येथे उक्ताड बायपास रोड इजतिमा मैदानावर हजारो मुस्लिम एकत्र येऊन मुफ्ती साबीर डांगे यांचे इमामत खाली पाऊस येणे करीता नमाज अदा करण्यात आली.
मौलाना सादिक मेस्त्री यांनी आपल्या प्रवचना मधून पवित्र ग्रंथ कुराण व हदीस शरीफ यांचे संदर्भ देऊन पाण्याचे महत्व सांगितले पैगंबर हजरत मुहम्मद स. अ. व स. यांनी आपण प्रत्येक बाबतीत पाणी कसे व किती वापरावे याचे आदेश दिलेले आहेत वाहत्या पाण्यात जर वजु करीत असाल तरी दिलेल्या प्रमाणातच पाणी वापरावे असे सांगितले आहे त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब अल्लाह ला द्यावयाचा आहे. याच अनुषंगाने झाडाचे फार महत्व आहे. एक झाड लावून आपण जगविले तर त्या झाडापासून जो जो सजीव फायदा घेईल व जो पर्यंत घेईल तो पर्यंत त्याचे सदका चे पुण्य त्या झाड लावणाऱ्याला व जगविणाऱ्याला मिळत राहणार आहे. या करीता प्रत्येकाने झाड लावून ते जगविले पाहिजे असा संदेश दिला.

अखेर अल्लाह कडे प्रत्येक सजीवाला जो पाऊस उशिरा असल्याने त्रास होत आहे तो त्रास कमी व्हावा व ही परिस्थितीत ही त्याला सामना करण्याची ताकत मिळावी. आम्ही जी आज जी निसर्ग नियमाबाहेर जाऊन कृत्य करीत आहोत गुनाह करीत आहोत त्याची माफी मिळावी व सदमार्गांवर चालावे. आमच्या गुनाहला माफी मिळून अल्लाह तआलाने जो पाऊस विलंबला आहे तो सुरु व्हावा व सजीवांना राहत मिळावी या करीता प्रार्थना करण्यात आली.