चिपळूण : शहरातील कु. श्लोक अनुराधा सचिन शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप घेत महाराष्ट्र राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार श्री. उदयजी सामंत साहेब प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आयोजित ‘भारत उदय’ राष्ट्रीय स्पर्धेतील गट क्र. ३ मध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले.
या उल्लेखनीय यशाबद्दल चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री. शेखरजी निकम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस जयंतशेठ खताते, चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष नितीन (अबुशेठ) ठसाळे, नगरसेवक मिथिलेश नरळकर, अजय भालेकर, नगरसेविका वैशाली कदम, नगरसेविका शिल्पा देसाई, माजी नगरसेवक मनोज जाधव, युवक शहराध्यक्ष सिद्धेश लाड, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर, ज्येष्ठ समाजसेवक शितल देवेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
