चिपळूण : विश्व हिंदू परिषदेचा वटवृक्ष हे बोधचिन्ह आहे हे आपणास माहित आहेच. त्यास अनुसरून सोमवार दिनांक 29 जून रोजी वटपौर्णिमा आहे. त्या दिवशी सकल हिंदू समाजातील सर्व मातृ शक्तींसाठी पूजा विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व महिलांना सोयीचे व्हावे म्हणून म्हणून दोन ठिकाणी वटवृक्ष चे पूजा विधी कार्यक्रम होणार आहे.
1) जुना भैरी देवस्थान येथील वटवृक्ष
2)खेर्डी येथील माळे वाडी ,मारुती मंदिरा जवळील येथील वटवृक्ष .
अशा एकूण दोन ठिकाणी पूजा विधीचे नियोजन करण्यात आले आहे .पूजा विधीसाठी आवश्यक असणारे साहित्य विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात येईल तसेच गुरुजींचीही विनामूल्य व्यवस्था करण्यात आलेली आहे .सकल हिंदू समाजातील सर्व महिलांनी या दोन ठिकाणी सोयीचे असेल त्याप्रमाणे पूजा विधीसाठी यावे व आपले स्वहस्ते पूजा विधी करावा यासाठी खाली महिला कार्यकर्त्यांची नावे व फोन नंबर देत आहे त्यांचे जवळ 27 जून पर्यंत नाव नोंदणी करावी म्हणजे आम्हास सर्व पूजा साहित्याची व्यवस्था करणे सोयीचे जाईल. अशा प्रकारचे नियोजन आपण प्रथमच करीत आहोत तरी सर्व महिला वर्गाने सहकार्य करणे अपेक्षित आहे. पूजा विधी कार्यक्रमाची वेळ -सोमवार दिनांक 29 जून रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारापर्यंत 9-30त12-30 असेल.
आपल्या सोयीनुसार या वेळेत येऊन पूजा विधी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे नम्र आवाहन विश्व हिंदू परिषद मातृ शक्ती करीत आहे. तरी सकल हिंदू समाजातील सर्व जातीच्या महिला वर्गाने या पूजा विधी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही आग्रहाची नम्र विनंती.
आपला विश्व हिंदू परिषद मातृशक्ती विभाग .
खालील प्रमाणे संपर्क करावा.
सौ लीना भाटिया फोन नंबर
9422056 787
सौ नेहा संजय सोमण
98819 25530
सौ गीता सोमण 8928753486
सौ वैशाली अभ्यंकर खेर्डी
9588405326