चिपळूण : चिपळूण शहरातील खेंड महालक्ष्मी नगर येथील कु. आर्या माया प्रकाश कदम हिने एमबीबीएस पदवी संपादन करून आपल्या कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

आर्या या उद्योजक प्रकाश कदम (इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसाय) आणि सौ. माया कदम यांच्या कन्या आहेत. सौ. माया कदम या आर. सी. काळे विद्यालय, पेढे-परशुराम येथे प्राथमिक विभागात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

आर्या हिने इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण आर. सी. काळे पेढे-परशुराम महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेत सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी प्राप्त केली.

आर्या हिने या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री.शेखरजी निकम सर यांच्या हस्ते अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.