ठाणे : ठाण्यात प्रस्तावित डेटा सेंटर प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात टीडीआर देण्यात येत असून नगरसेवकांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

हजारो झाडांची कत्तल, पाण्याचा वाढता वापर आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा आव्हाड यांनी केला. डेटा सेंटरमुळे स्थानिक नागरिकांना नेमका काय फायदा होणार, असा सवाल उपस्थित करत प्रकल्पाच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच महासभेची परवानगी, पर्यावरणीय परिणाम आणि प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.