चिपळूण : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या संकल्पनेतून चिपळूण येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा यामागील मुख्य उद्देश आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
हे योग शिबिर रविवार, २१ जून २०२६ रोजी सकाळी ०६:३० वाजता रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृह, प्रांत कार्यालय मागे, शिवाजीनगर चिपळूण येथे पार पडणार आहे. या शिबिरामध्ये विविध योगप्रकारांचे प्रात्यक्षिक, मार्गदर्शन तसेच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत सखोल माहिती दिली जाणार आहे.
आयोजकांच्या मते, “योग हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे,” या संकल्पनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन निरोगी जीवनाचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योगाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे, याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या योग शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ९८९००२८०७८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे चिपळूण शहरातील नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग मिळणार असून, योग दिन अधिक उत्साहात साजरा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.