चिपळूण : आंबा बागायतदार हवामानाच्या वातावरणामुळे आंबा ,काजू यांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे ही करण्यात आले, परंतु आजतागायत त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. हे बागायतदारांची समजूत करण्यासाठी पंचनामे करण्यात आले का ? असा प्रश्न चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत भाई मुकादम यांनी उपस्थित केला आहे.
व ते पुढे म्हणाले की, बागायतदार व पर्स बागामध्ये असणारी हापूस आंब्याची पाच दहा कलमे यांना पावसाळी भरणी करून खत टाकावे लागते. याकरिता संबंधितांना आता शासनाच्या मदतीची गरज आहे. वेळ निघून गेल्यावर मग त्याच काय उपयोग ? असेही मुकादम म्हणाले.