रत्नागिरी : कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, जिल्हा- नाशिक – सदगुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत विनामूल्य आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबिर अतिशय उत्साहात संपन्न झाले. 7 केंद्रांमध्ये हे आरोग्य शिबिर संपन्न झाले. सातही केंद्रांमध्ये आरोग्य शिबिरात एकूण रुग्ण तपासणी संख्या:- 684 इतकी झाली. नाचणे केंद्र, कारवांचीवाडी केंद्र, पाली केंद्र, लांजा केंद्र, शिपोशी केंद्र, साटवली केंद्र, कसबा केंद्र या सर्व केंद्रातील केंद्र प्रतिनिधी, शिबिर नियोजन प्रतिनिधी तसेच जिल्हा प्रतिनिधी या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार प्रसार केल्यामुळेच हे शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध संपन्न झाले तसेच विशेष बाब म्हणजे नाचणे केंद्रातील सेवेकरी यांनी सुद्धा औषधांच्या स्टॉलची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील ही शिबिर चांगल्या पद्धतीने पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील राहिलेल्या केंद्रात आपण आगामी काळात आरोग्य शिबिरांचे नियोजन आपल्या संमतीनेच करणार आहोत तेव्हा आपण अशाच पद्धतीने पुढील शिबिरांचे नियोजन करू.
रत्नागिरी जिल्ह्यात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठातर्फे विनामूल्य आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबिर उत्साहात संपन्न…
