मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणावरून शिवसेना नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याचे समजते. सरकारला साधा TET चा पेपरही सांभाळता येत नाही. NEET ची सर्व परीक्षा केंद्रे महाराष्ट्रात आहेत.
एकीकडे सरकार ‘गुड गव्हर्नन्स’च्या गोष्टी करते, पण या पेपरफुटीमध्ये सरकारचाच कुठेतरी सहभाग असल्याची शंका येते. छोटीशी परीक्षाही सरकारला व्यवस्थित घेता येत नाही. हे सरकार रामभरोसे चालत आहे,” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या वाशिम दौऱ्यानिमित्त ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
