लांजा:(गोविंद चव्हाण) : साने गुरुजी विचार मंच लांजा आणि कुणबी सेवा संघ लांजा यांचे संयुक्त विद्यमाने काळे कुलकर्णी छात्रालय लांजा येथे सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजश्री शाहू महाराज यांची 152 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची चळवळ गतिमान करा असे प्रतिपादन साने गुरुजी विचार मंचाचे सचिव श्री सुधाकर कांबळे सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे मनोगतात व्यक्त केले.
कागल संस्थानात जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे यांना २६ जुन १८७४ मध्ये यशवंत घाटगे यांचा जन्म झाला अत्यंत हुशार अशा मुलाला जयसिंगराव यांनी १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूर गादीला दत्तक दिला. त्यावेळी त्यांचे नाव शाहू ठेवण्यात आले. कोल्हापूर संस्थांनच्या कारभारी सूत्रे शाहू महाराजांनी वयाच्या दहाव्या वर्षीच हाती घेतली. आणि लोक कल्याणाच्या इतिहासात समतेचा दीप प्रज्वलित केला. भारत त्या काळात जातीव्यवस्थेने ग्रासलेला होता धर्म मार्तंड आणि सामाजिक व्यवस्थेवर अंधार पसरवला होता अशा परिस्थितीत शाहू महाराजांनी बहुजनांच्या कल्याणकारी योजना आपल्या संस्थानांमध्ये राबविण्यास सुरुवात केली. समता मुलक समाज निर्मिती करून अखंड भारतामध्ये कोल्हापूर संस्थान नावा रूपाला आणले शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही,म्हणून त्यांनी आपल्या संस्थानात मुला-मुलींसाठी वस्तीगृह बांधली.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची चळवळ गतिमान करा !….सुधाकर कांबळे.
