चिपळुण : प्लास्टिक निर्मूलन दिन निमित्त लायन्स क्लब चिपळूण यांच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा, रावतळे येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी लायन्स क्लब चिपळूणचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास परांजपे यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी किती घातक आहे, त्याचे दुष्परिणाम आणि प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच, पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचावा या उद्देशाने सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. दैनंदिन जीवनात प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा, असा संदेश यावेळी देण्यात आला…ह्या कार्यक्रमाला सह सेक्रेटरी शाम परांजपे ..तसेच रावतळे शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय आंबवकर सर..सौ गवस मॅडम..श्री. चव्हाण सर..सौ.कुरणे मॅडम उपस्थित होते..व डाॅक्टर सौ.श्रुतीका कोतकुंडे मॅडम हजर होत्या..

“प्लास्टिकला नकार, पर्यावरणाला होकार!” हा संदेश देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.