चिपळूण : खेंड महालक्ष्मी महिला मंडळ च्या वतीने एसटी हाफ तिकीट (NCMC) कॅम्प नुकताच घेण्यात आला. कॅम्प चे उद्घाटन भाजपच्या सरचिटणीस सौ सारीकाताई भावे, नगरसेवक निलीमाताई जाधव,समाजिक कार्यकर्त्या तृप्ती कदम,राधिका पाथरे,श्रीम.शोभा पालकर यांच्या हस्ते करण्यात आले.
महिलांची गरज ओळखून महालक्ष्मी महिला मंडळ ने हा कॅम्प श्री. सुधिर पालकर यांच्या इथे आयोजित केला होता. हे सामाजिक काम समजून श्री . पालकर यांनी या कॅम्प साठी जागा उपलब्ध करून दिली.
मंडळाने हा कॅम्प आसपास च्या महिलांसाठी पण आयोजित केला होता. त्यामुळे महिलाना स्टँड वर जाऊन तासन् तास उभे राहण्याचे , वेळ, पैसा खर्च करण्याचे कष्ट कमी झाले.
मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्नेहल पालकर यांनी पुढाकार घेऊन हा कॅम्प आयोजित केला होता.या कॅम्प चे नियोजन सौ. तृप्ती कदम आणि गीता चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कॅम्प घेण्यासाठी.सुर्वे मॅडम आणि भोसले मॅडम उपस्थित होत्या.
तसेच हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी मंडळातील आजी माजी कमीटी तील सौ.माधुरी बनसोडे, नम्रता ओसवाल, योजना कडवईकर ,रिया महाडिक, आरती वाटेकर, अस्मिता काणेकर, सुजाता यादव ,दिया कदम, स्वाती , दिपाली मुळे,श्रेया पवार यांनी सहकार्य केले.१०० महिलांनी या कॅम्पचा लाभ घेतला.
चिपळूणच्या खेंड, महालक्ष्मी नगर मध्ये एस टी. हाफ तिकीट (NCMC) कॅम्प संपन्न…
