रोहा ( प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात गेल्या ५ ते ६ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रोहा-अष्टमी परिसरातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे रोहा शहरात अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले.
पुराचे पाणी ओसरल्यानंतर अष्टमी गावासहित रोहे शहरात मोठ्या प्रमाणात गाळ,कचऱ्याचा साम्राज्य पसरले होते. त्याचप्रमाणे कुंडलिका नदीच्या पुलावर पुराच्या पाण्यात वाहून आलेला कचरा व ओंडके देखील काढून हा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. पुराचा पाणी ओसरल्यानंतर ज्या लोकवस्तीत बाहेर रस्त्यावर व बाजार पेठेत कचरा टाकण्यात आला होता. तो कचरा देखील तातडीने उचलून परिसर चकाचक करण्यात आला आहे.सोमवारी मध्यरात्री पुराचे पाणी कमी होताच मंगळवारी सकाळी नगर पालिकेची टीम कामाला लागली.अवघ्या सहा तासांच्या आत रोहे नगर पालिकेने स्वच्छ करून शहराला रोगराई होण्यापासून वाचवले.त्यामुळे नागरिकांना विशेषता व्यापारी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
नगराध्यक्ष वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके,कार्याध्यक्ष समीर शेडगे, उपाध्यक्ष अहमद दर्जी,सभापती राजेंद्र जैन,मयूर दिवेकर, नीता हजारे, रविंद्र चाळके महेश कोल्हटकर, गट नेते महेंद्र गुजर,नगरसेवक अजित मोरे, प्रशांत कडू,अरबाज मनेर,नगरसेविका सौ.फराह पानसरे,सौ.संजना शिंदे, गौरी बारटक्के, डॉ.प्रियांका धनावडे, अफारिन रोगे,अलमास मुमेरे,माझ सवाल, प्रेषित बारटक्के, स्वप्नील धनावडे आदींनी पूरग्रस्त भागात भेट देऊन नागरिकांना दिलासा देत स्वच्छता,गाळ व कचरा हटविणे तसेच नुकसानग्रस्त रस्त्यांच्या स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर करून घेतली.
