मुंबई : वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेश यांच्या वतीने ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, वैद्यकीय, शैक्षणिक, तंत्रज्ञान, कला, सांस्कृतिक आणि फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी ‘VBA सन्मान पुरस्कार – २०२६’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान करून समाजातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले. हा कार्यक्रम ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यगृह येथे पार पडणार आहे. तसेच कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
