लांजा : (गोविंद चव्हाण) लांजा-कोत्रेवाडी येथील काजू फॅक्टरीतून अज्ञात चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीच्या काजूच्या मालाची चोरी केली. याप्रकरणी सुहास सुरेश झिमण (वय ४५, रा. लांजा) यांनी लांजा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दि. २८ मे ते दि. २९ मे या कालावधीत कॅश्यू प्रोसेसिंग युनिटच्या शेडमध्ये ठेवलेल्या मालाची चोरी झाली. यामध्ये समीर पंडित यांचा ४२ हजार रुपये किमतीचा अख्खा काजू, दहा किलोच्या ३७ बॅगा (एकूण ३७० किलो), त्यातील १७ किलो काजूगर व ३२ किलो तुकडा, तसेच ४८ हजार रुपये किमतीचा वैयक्तिक काजू, दहा किलोच्या ४८ बॅगांमध्ये ठेवलेला माल असा एकूण ९० हजार रुपये किमतीचा काजू माल चोरीला गेला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी लांजा पोलीस तपास करीत आहेत.