चिपळूण : शिरगाव..चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली येथे आज मंगळवार दि.१७ मार्च रोजी आई महाकाली देवीचा छबिना साजरा होत असून विद्युत् रोषणाई खास आकर्षण ठरणार आहे.
शिरगाव कुंभार्ली पोफळी तीन गावचे जागृत देवस्थान आई महाकाली देवीचा छबिना महिनाभर सुरू असतो त्यात कुंभार्ली येथील आई महाकाली देवीचा छबिना महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध आहे आज मंगळवार दि.१७ मार्च रोजी आई महाकाली देवीचा छबिन्यास रात्री 11 वाजता सुरू होईल कुंभार्ली ग्रामपंचायत कार्यालय समोरील पटांगणमध्ये पालखी नाचविण्यात येईल.यावेळी पंचक्रोशीतील ढोल ताशे , अंबारी,आकर्षक विद्युत रोषणाई व गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी छबिण्यात करण्यात येईल.
तरी आई महाकाली देवीच्या छबिण्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कुंभार्ली ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.