चिपळूण : श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचा ञैवार्षिक “किरका” मिरवणुक वार रविवार दि.१९ जुलै २०२६ रोजी गोवळकोट-पेठमाप ,मजरेकाशी गावचे सुप्रसिध्द जागृत श्रध्दास्थान श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचा ञैवार्षिक “किरका ” मिरवणूक रविवार दि.१९ जुलै रोजी दुपारी ३ ते ६ या कालावधीत गोवळकोट , पेठमाप गावच्या चतु:सीमेत सवाद्द फिरणार आहे.
श्री देवी करंजेश्वरी मंदिरात दुपारी ३ वाजता किरकेचा मांड भरणे धार्मिक विधी नंतर मंदिरातुन दुपारी ३. ३० वाजता किरका मिरवणूक सवाद्य निघून गोवळकोट गोविंदगडावर श्री देवी रेडजाईला भेट देऊन गावातून -गोवळकोट धक्का,भोईवाडी, गोवळकोट रोडवरुन बाजारपुलामार्गे सुमारे ५ वा पेठमापात गणेशवाडी, बुरटेआळी, साईनाथ आळी,तांबट आळी, वाणी आळीतुन पेठमाप सिमेवर या किरका मिरवणुकीची ५. ३० वाजता सांगता होईल याची नोंद घेऊन देवस्थांनचे समस्त मानकरी, सेवेकरी, भक्तगण, कार्यकर्ते यानी भावीकपणे सहभागी व्हावे व आवश्यक सहकार्य करावे. असे आवाहन श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे करण्यात येत आहे.
अध्यक्ष श्री देव सोमेश्वर श्री देवी करंजेश्वरी देवस्थान गोवळकोट- पेठमाप चिपळूण
