लांजा:(गोविंद चव्हाण) लांजा राजापूर या दोन्ही तालुक्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर लांजा तेथील गणेश मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.याशिबीरात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी जमिन संदर्भात अती मोलाचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले ते प्रत्येक विषयाच्या अडी अडचणी वर मार्गदर्शन केले बिनशेतीसाठीअनेक कागदपत्र त्यासाठी पैसा भरपूर खर्च करावा लागत होता .तेआता बिनशेती अट रद्द करण्यात आली तसेच तुकडे बंदी तुकडेजोड कायद्याच्या विरूद्ध असा शेरा ठेऊन सातबारा वर बोजा ठेवला जात होता.तो रद्द करण्यात आला आता किती जमिन कमी असली तरी खरेदी करता येईल असे सांगितले.
या शिबिरात प्रत्येक विभागाचे स्टाॅल लावण्यात आले होते.तिथे त्या त्या विभागाचे कर्मचारी होते.तिथे शेतकऱ्यांनी जाऊन काही प्रश्न विचारले तर ते महीती सांगत असत विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच पात्रं लाभार्थ्यांना योजनांचे प्रत्यक्ष लाभ वितरण करण्यात येत होते.भरपुर लाभार्थी यांना देण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून पुष्प हार अर्पण करून वट वृक्षाला पाणी घालून त्यानंतर मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले. प्रमाणपत्र देण्यात आली.वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.बचत गटांना गौरवण्यात आले.सदर कार्यक्रम सकाळी १०ते सायंकाळी ५पर्यत होता.या वेळी व्यासपीठावर मान्यवर अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे,विलास चालके, सभापती मानसी आंबेकर,लांजा राजापूर साखरपा विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू करूप, तहसीलदार प्रियांका ढोले, गटविकास अधिकारी श्री गिरी,नगर पंचायतीचे सिओ अभिजित कुंभार, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे अन्य राजापूर लांजा तालुक्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
विधानसभा मतदारसंघ निहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समधान शिबिर संपन्न.
