चिपळूण : नीटसह विविध स्पर्धा परीक्षांतील कथित पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला खेळ आणि पेपरफुटीविरोधी आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक, अभिजित दिपके तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले आहे.
युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेनेच्या वतीने…गुरुवार, २३ जुलै २०२६ , सकाळी ११.०० वाजता , डी.बी.जे. महाविद्यालय (कॉलेज) समोर, चिपळूण . या वेळी : स्वाक्षरी अभियान , काळ्या फिती बांधून लाठीमाराचा निषेध, विद्यार्थी-युवा आंदोलनाला जाहीर पाठिंबा.
हा लढा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. पेपरफुटी करणाऱ्यांना संरक्षण देणे आणि न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठ्या चालविणे, हे लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य आहे. आता शांत बसण्याची वेळ संपली आहे.
चला, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी, पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी आणि युवकांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी एकत्र येऊया.
आपली उपस्थिती हीच विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला सर्वात मोठी ताकद ठरेल.
श्री. प्रितम वंजारे
युवासेना तालुका अधिकारी, चिपळूण
श्री. पार्थ जागुष्टे
युवासेना शहर अधिकारी, चिपळूण