लोटे : मुंबई गोवा महामार्गावरील पीरलोटे येथे महामार्गाच्या पूर्वेला कोर्टीवा क्रॉप इंडिया प्रा.ली. कारखान्यासमोर सर्विस रोडला अक्षरशः तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून येथे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. जीव मुठीत घेऊन प्रवास करतानाही अपघाताची शक्यता बळावली आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला कित्येक वर्षे लोटली तरी अद्याप हे काम अपूर्णच आहे. कामाच्या दर्जाच्या बाबतीतही अनेक वेळा वाहन चालक आणि लोकप्रतिनिधींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र तरीही या महामार्गाचे आणि दुतर्फा सर्विस रोडचे काम अद्याप अपूर्ण असून जिथे पूर्ण झाले आहे तिथे निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप आजही केला जात आहे. सर्विस रोडला अनेक ठिकाणी अक्षरशा तळ्याचे आणि नदीचे स्वरूप प्राप्त झालेले आहेत अनेक ठिकाणी दोन दोन फूट खड्डे पडलेले असून पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहन चालकांचे अपघात होत आहेत. असाच प्रकार पिरलोटे येथील कॉर्टीवा क्रॉप इंडिया प्रा. ली. कारखान्याच्या समोर असलेल्या सर्विस रोडवर पहावयास मिळत आहे एक ते दीड फुटाचे खड्डे सर्विस रोडला पडले असून अक्षरशा येथे तळे आहे की रस्ता हे वाहन चालकांना समजत नाही. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि अनेक दुचाकी स्वारी येथे अपघात ग्रस्त होत आहेत. तरी संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने पाहून ताबडतोब महामार्गाच्या ठेकेदाराकडून या सर्विस रोडची दुरुस्ती करून घ्यावी आणि संभाव्य अपघात टाळावेत अशी संतप्त मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकांकडून केली जात आहे.
पिरलोटे येथे सर्विस रोडला आले तळ्याचे स्वरूप.वाहन चालकांचे हाल, अपघातांची शक्यता वाढली….
